विषय: १ एप्रिल २०२५ पासून प्रस्तावित फेस बायोमेट्रिक उपस्थिती व लोकेशन ट्रॅकिंग प्रणालीविषयी निर्माण होणाऱ्या शंका व अडचणी संदर्भात मार्गदर्शन मिळणे बाबत.
प्रति,
मा. जिल्हा आरोग्य अधिकारी,
जिल्हा परिषद ……….
विषय: १ एप्रिल २०२५ पासून प्रस्तावित फेस बायोमेट्रिक उपस्थिती व लोकेशन ट्रॅकिंग प्रणालीविषयी निर्माण होणाऱ्या शंका व अडचणी संदर्भात मार्गदर्शन मिळणे बाबत.
महोदय,
१ एप्रिल २०२५ पासून आरोग्य विभागामार्फत प्रस्तावित फेस बायोमेट्रिक उपस्थिती प्रणाली व लोकेशन ट्रॅकिंग यांच्या अंमलबजावणीबाबत आमच्या आस्थापनेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मनात काही शंका व अडचणी निर्माण होत आहेत. त्या प्रश्नांची शासकीय स्तरावर स्पष्टता मिळावी, यासाठी खालीलप्रमाणे मार्गदर्शन विनंतीपूर्वक मागवले आहे:
1. ही प्रणाली वापरताना कर्मचाऱ्यांच्या गोपनीयतेचा (Privacy) भंग होत नाही का?
• फेस स्कॅन व लोकेशन ट्रॅकिंग हे संवेदनशील व खासगी माहितीच्या श्रेणीत मोडते. या माहितीचे संरक्षण कशा प्रकारे होईल?
• डेटा सुरक्षिततेबाबत कोणते उपाय योजण्यात येत आहेत? संबंधित यंत्रणांकडे याची कायदेशीर व तांत्रिक जबाबदारी कोणाकडे असेल?
2. IN व OUT वेळेची अचूक नोंद ठेवताना ग्रामीण सेवाभावाचा विचार केला जाईल का?
• आपत्कालीन परिस्थितीत किंवा अधिक वेळ काम केल्यास त्या वेळेचे श्रेय कसे दिले जाईल?
• वेळेच्या अचूकतेसाठी कोणते नियम आखले जाणार आहेत?
3. OUT नोंदीनंतर जर एकाच डॉक्टरकडे किंवा कर्मचारी कडे संपूर्ण जबाबदारी असेल, तर रुग्णसेवा कोण पार पाडणार?
• अशा स्थितीत सेवा विस्कळीत होणार नाही यासाठी पर्यायी व्यवस्था किंवा नियमावली आहे का?
• ऑन-कॉल ड्युटी संबंधित वेळेची नोंद कशी होईल?
4. दुर्गम भागात नेटवर्क नसल्यास बायोमेट्रिक हजेरी कशी नोंदवली जाणार?
• अशा वेळी कोणती पर्यायी यंत्रणा उपलब्ध असेल?
• हजेरी नोंद न झाल्यास कर्मचाऱ्यांस चुकीच्या परिणामांना सामोरे जावे लागणार का?
5. २४x७ सेवा देणाऱ्या डॉक्टरांच्या /कर्मचाऱ्यांच्या सेवापद्धतीशी ही प्रणाली सुसंगत असेल का?
• ऑन-कॉल, इमर्जन्सी ड्युटी, Deputations ,उपकेंद्र भेटी , या सेवांचे दस्तऐवजीकरण कसे होणार?
• यासंबंधी स्वतंत्र धोरण किंवा स्पष्टीकरण उपलब्ध आहे का?
6. मानवाधिकार, मूलभूत अधिकार व खासगी माहितीचे रक्षण करण्यासाठी विभागाकडे कोणते नियम आहेत?
• अशा प्रणालीविरोधात इतर राज्यांमध्ये कर्मचारी संघटनांनी किंवा न्यायालयांनी हरकती घेतल्या आहेत. आपल्या विभागाने अशा बाबींचा अभ्यास केला आहे का?
वरील सर्व शंका आणि अडचणींच्या अनुषंगाने आम्हाला आपल्या स्तरावरून सविस्तर व लेखी मार्गदर्शन मिळावे, तसेच आवश्यकता भासल्यास संबंधित धोरणांची प्रत उपलब्ध करून द्यावी, ही नम्र विनंती आहे.
हे पत्र प्राथमिक आरोग्य केंद्र, ..,… येथील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या सहमतीने सादर करण्यात येत आहे. सर्व संबंधितांनी यावर स्वाक्षरी केलेली आहे.
आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.
आपला विश्वासू,
वैद्यकीय अधिकारी
प्राथमिक आरोग्य केंद्र, ……….
(सर्व अधिकारी व कर्मचारी – स्वाक्षरी संलग्न)
Medical Officer PHC Walwa Contact the author of the petition